सोलापूरच्या शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात

सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेला शेटे वाड्यात सिद्धेश्वर योगदंडच्या पूजेने सुरुवात झाली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 11, 2018, 10:32 AM IST
सोलापूरच्या शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात title=

सोलापूर : सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेला शेटे वाड्यात सिद्धेश्वर योगदंडच्या पूजेने सुरुवात झाली आहे.

७ दिवसांची यात्रा

७ दिवस म्हणजेच १७ जानेवारी पर्यंत ही यात्रा सुरु राहणार आहे. सिद्धेश्वर यात्रा हि सिद्धरामेश्वरच्या योगदंडशी कुंभार कन्येचा झालेल्या प्रतीकात्मक विवाह सोहळा असतो. मानकरी शेटे यांच्या वाड्यात सिद्धेश्वर महाराजांचा योगदंडची विधिवत पूजा करून होमहवन आणि पादपूजा करण्यात आली.

लाखो भाविकांची गर्दी

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या परिवारासह यावेळी उपस्थित होते. सिद्धेश्वर यात्रेला कर्नाटक, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील ३ ते ४ लाख भाविक उपस्थित असतात.

व्हिडिओ