लातूर : आपण सापाला कधी पाणी पिताना पाहिलं का? या प्रश्नाचं उत्तर नाही, असंच मिळतं. मात्र, सर्प मित्रानी चक्क सापाला पाणी पितांना टिपलंय. किंग कोब्राला लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव येथे एका घरात जमिनीवर पाणी होते, तेथे दिसलेला साप पकडण्यासाठी सर्प मित्र गेले होते.
पकडललेला किंगकोब्रा जंगलात सोडून देण्यापूर्वी, एका सर्पमित्राने कोब्रा साप पाणी असलेल्या ठिकाणी का गेला असेल असा विचार केला, आणि एका खड्ड्यातील पाण्यात कोब्रा नागाचे तोंड लावले.
तेव्हा आश्चर्य असे की तो साप पाणी पिऊ लागला. त्यावेळी दुसऱ्या एका सर्पमित्राने हा दुर्मिळ प्रकार कॅमेऱ्या कैद केला. सहसा साप किंवा नाग पाणी पिताना आढळत नाहीत, कारण ते जे भक्ष्य खातात बेडूक, उंदीर यांच्यात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे त्यांना सहसा जास्त पाणी पिण्यासाठी लागत नाही. पण हा किंग कोब्रा जातीच्या या नागाला पाणी पितानाचे हे दृश्य दुर्मिळ आहे.