जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 मुसळधार पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर आला आहे.  तर जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Updated: Sep 26, 2019, 07:49 PM IST
जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा title=

नाशिक : कळवण, सटाणा तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पैठणजवळील जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत. या काळात तिसऱ्यांदा हे दरवाजे उघडण्यात आले आहे. नांदूर मधमेश्वर कालव्यातून आणि नाशिक भागातून  पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 

परतीच्या पावसाने निफाडच्या नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीच्या पात्रात विक्रमी ४४ हजार ३५० क्युसेकचा विसर्ग. त्यामुळे हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गोदावरीला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. वरील भागातून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. 

नाशिकच्या कळवण, सटाणा तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर आलाय. गिरणा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग  वाढविण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण असलेलं गिरणा धरण १२ वर्षानंतर ओहरफ्लो झालं असून याआधी धरणाच्या एकूण १४ दरवाजांपैकी २ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु होता. आता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे.