सायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ गॅसगळती

सायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती झाल्याने एकच धावपळ उडाली. 

Updated: Aug 11, 2018, 05:00 PM IST
सायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ गॅसगळती title=

नवी मुंबई : सायन- पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती झाल्याने एकच धावपळ उडाली. या गॅसगळतीमुळे दोन्हीकडील बाजुने वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस दुसऱ्या टॅंकरमध्ये भरण्यात आला.  ही घटना सानपाडा पुलावर रात्री साडे तीन वाजता घडली.

सायन - पनवेल महामार्गावर शनिवारी सकाळी एका टँकरला गाडीने  मागून धडक दिली. त्यानंतर टॅंकरमधून गॅसगळती झाली. अती ज्वलनशील गॅस असल्याने दोन्ही बाजूने वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यानंतर एक्स्पर्ट टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमने दुसऱ्या टॅंकरमध्ये गॅस भरला.

आता पूर्णपणे येथून वाहतूक सुरळीत झालेय. मात्र, सकाळीपर्यंत सायन पनवेल महामार्गावर  वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. दरम्यान, या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.