घातपात कटातील संशयित सुधन्वा गोंधळेकरची कुटुंबियांकडून पाठराखण

सुधन्वाच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसलाय.

Updated: Aug 11, 2018, 05:00 PM IST

मुंबई : अवैध शस्त्रसाठा प्रकरणाशी आपल्या मुलाचा काहीही संबंध नसल्याचे आरोपी सुधन्वा गोंधळेकर यांनी म्हटलंय. सुधन्वाच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसलाय. या सगळ्या प्रकरणाशी अनभिज्ञ असल्याचे त्याचे वडील सुधीर गोंधळेकर यांनी म्हटलंय. सुधन्वा गोंधळेकर हा मूळचा साता-यातील असून तो सातारा शहरातील करंजे परिसरात राहतो. त्याचा पुण्यात ग्राफिक डिझाईनचा पुण्यात व्यवसाय असून त्याचे लग्न झालेले आहे. त्याला दोन लहान मुली असून त्याचा लहान भाऊ पुण्यात आयटी क्षेत्रात शिक्षण घेतोय.