सातारा : राज्यात (Maharashtra) कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण ( Corona vaccine) मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत लसीचे डोस संपल्याने लसीकरण थांबविण्याची वेळ आली आहे. साताऱ्यात (Satara) सर्वात आधी लसीकरण केंद्रही बंद करण्यात आली आहेत. राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा आहे. याबाबत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी अजब आणि धक्कादायक विधान केले आहे. (Shortage of corona vaccine: Shocking statement of Udayan Raje Bhosale)
साताऱ्यामध्ये लसीचे सर्व डोस संपले असून त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आल्याची माहिती साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. त्यामुळे आता साताऱ्यामध्ये लसीचा पुरवठा पुन्हा सुरु होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे. खासदार उदयनराजे भोसले याना विचारले असता त्यांनी एक अजब दावा केला आहे. राज्यात कोरोना लसचे नियोजन होऊ शकले नाही यामागचं कारण हे फॅमिली प्लॅनिंग न केल्यामुळे झाले असल्याचे अजब मत व्यक्त केले आहे.
यावेळी बोलताना त्यांना कोणत्यातरी कार्यकर्त्याने साताऱ्याची नगरपालिका महानगरपालिका करण्याचे सुचवले होते. त्या गोष्टीची आठवण करुन देत जिल्ह्याची लोकसंख्या काय मी वाढवायची का, असा टोला त्या कार्यकर्त्याला हाणल्याचे ही उदयनराजे सांगायला विसरले नाही.
आजपर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण 2 लाख 56 हजार 434 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात एकूण 446 कोरोना लसीकरण केंद्रे आहे आता डोसच शिल्लक नसल्याने सर्व केंद्र बंद आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.