आईच्या प्रियकराकडून लेकीनं उकळली खंडणी, तरूणीसह मित्राला बेड्या

आईच्या प्रियकाराकडून मुलीनं तिच्या मित्राच्या मदतीनं खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Updated: Sep 5, 2021, 08:54 PM IST
 आईच्या प्रियकराकडून लेकीनं उकळली खंडणी, तरूणीसह मित्राला बेड्या title=

पुणे : नैतिकतेला काळीमा फासणारा प्रकार पुण्यात घडला आहे. एका तरूणीला आपल्या आईच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. त्यानंतर तिनं असं काही केलं. की तिला थेट तुरूंगाची हवा खावी लागलीय. तिच्या कृत्यानं पोलिसही चक्रावून गेलेत. नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊयात. (shocking incident of a girl get a ransom from her mother's lover with the help of her friend in Pune)

आईच्या प्रियकाराकडून मुलीनं तिच्या मित्राच्या मदतीनं खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलाय. मुलीला आईच्या प्रेमाचा सुगावा लागताच तिनं आईचा व्हॉट्सअप हॅक केला. तिचे आणि तिच्या प्रियकराचे काही फोटो आणि अश्लील व्हिडीओ मिळवले. नंतर आपल्या मित्राच्या मदतीनं ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरु केला. फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत ती आणि तिच्या प्रियकरानं आईच्या प्रियकराकडे 15 लाखांची खंडणी मागितली. 

विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याला 1 लाखांची खंडणी देताना मुलगी आईच्या प्रियकरासोबतही असायची. पैसे देऊन एकदाचं प्रकरण मिटवून टाका, असा सल्ला तिनंच आपल्या आईला दिला होता. मात्र खंडणीला वैतागलेल्या आईच्या प्रियकरानं पोलिसात धाव घेतली आणि मुलीचं बिंग फुटलं. 

या प्रकरणात कुरबावीतल्या मिथुन गायकवाडसह कर्वेनगर परिसरातील तरूणीला अटक करण्यात आलीय. आईसोबत प्रेमसंबध ठेवणार्‍या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी तिनं हा सगळा बनाव केला होता. बदनामीच्या भीतीनं आईचा प्रियकर असलेल्या व्यावसायिकानं तरूणीच्या मित्राला 2 लाख 60 हजार रूपये देखील दिले. पण, शेवटी सत्य समोर आलंच.

आई, लेक आणि प्रियकराच्या कहाणीनं पुण्यात वादळ उठलंय. कुणी आईला दोषी मानतंय तर कुणी लेकीच्या नावानं खापर फोडतंय. अर्थात हा विषयच इतका खोल आहे की पुणेकरांमध्ये चर्चा तर होणारच. हे वेगळं सांगायची गरज नाही.