पती घराबाहेर पडताच तो तिला भेटायला आला, पण अचानक पतीने मारली धडक आणि...

उच्चभ्रू सोसायटीत घडलेल्या धक्कादायक घटनेने पिंपरी-चिंचवड हादरलं

Updated: Oct 29, 2022, 01:58 PM IST
पती घराबाहेर पडताच तो तिला भेटायला आला, पण अचानक पतीने मारली धडक आणि... title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधल्या एका उच्चभ्रू सोसायटीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या मित्राला दहाव्या मजल्यावरुन ढकलून देऊन त्याची हत्या केली. पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसीमध्ये ही घटना घडली आहे. निलेश जोर्वेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर पंकज शिंदे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

काय आहे नेमकी घटना?
पंकजला त्याची पत्नी आणि मृत निलेश जोर्वेकरचे अनैतिक संबंध असल्याचं संशय होता. पंकज आधीपासूनच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. पंकजने आपल्या पत्नीला गावी जात असल्याचं सांगितलं आणि तो घराबाहेर पडला. त्यानंतर काहीच वेळात निलेश हा पंकजच्या पत्नीला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला. पंकज इमारतीच्या बाजूला दबा धरून बसलेला. निलेशला इमारतीत शिरताना पाहिल्यानंतर पंकजने अचानक धरी धडक मारली.

आपल्या घरात निलेशला पाहून संतापलेल्या पंकजने निलेशला आधी धारदार शस्त्राने भोसकले आणि त्यानंतर दहाव्या मजल्याच्या गॅलरीतून थेट खाली ढकलून दिले. यात निलेशचा जागीच मृत्य झाला. या प्रकारानंतर पंकज आपल्या मुलीला घेऊन लिफ्टने खाली उतरला त्याने निलेश मृत झाल्याचं बघितलं आणि त्यानंतर तो पुन्हा आपल्या घरी आला. 

या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंकज शिंदेला अटक केली असून अधिक तपास करत आहेत. पण घरात कुठेही रक्त सांडल्याचं दिसून न आल्याने पोलीसही संभ्रमात सापडले आहेत. निलेश खाली पडून मृत पावला की त्याला धक्का देण्यात आला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.