ठाणे : ठाण्यातील कळवा आरोग्य केंद्रावर धक्कादायक प्रकार घडला आहे. लस घेण्यासाठी आलेल्या महिलेला चक्क रेबीजची लस देण्यात आली आहे. आरोग्य केंद्रावर असलेल्या जबाबदार नर्स व डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेवरुन ठाण्यात नेमके काय सुरू आहे ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी महिलेला तीन डोस दिले गेले होते. त्यानंतर सेलिब्रिटी लसीकरण आणि आता चक्क रेबीजचे इंजेक्शन देण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे.
ही घटना समोर आल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोषींवर कारवाईचे आदेश दिले होते. या घटनेमुळे ठाणे महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.