धक्कादायक ! १६ वर्षीय मुलीवर १० जणांकडून बलात्कार

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Updated: Feb 12, 2020, 12:01 PM IST
धक्कादायक ! १६ वर्षीय मुलीवर १० जणांकडून बलात्कार title=

सोलापूर : सोलापुरात अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १६ वर्षीय या मुलीवर १० जणांनी अत्याचार केलेत. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर ५ जणांचा शोध सुरु आहे. आरोपीवर बलात्कार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील बहुतेक आरोपी हे रिक्षाचालक आहेत. या घटनेनंतर सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूर विजापूर रोडवर एका मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगी रडत असताना आढळली. एका व्यक्तीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.