कोल्हापुरात कचऱ्याच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक

कचऱ्याच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. कसबा बावड्यातला डंपिंग ग्राउंडवर लाखो टन कचराविना प्रक्रिया पडून आहे असं असताना देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर पालिकेवर कारवाई करत नाही आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकानी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दारात कचरा ओतून आंदोलन केलं आहे.

Updated: Jun 14, 2017, 04:40 PM IST
कोल्हापुरात कचऱ्याच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक title=

कोल्हापूर : कचऱ्याच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. कसबा बावड्यातला डंपिंग ग्राउंडवर लाखो टन कचराविना प्रक्रिया पडून आहे असं असताना देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर पालिकेवर कारवाई करत नाही आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकानी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दारात कचरा ओतून आंदोलन केलं आहे.

गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण  कोल्हापूर महानगरपालिका याकडं गांभिर्यानं लक्षच द्यायला तयार नाही.  इतकच नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील महानगरपालिकेवर कारवाई करायला तयार नाही; परिणामी बावड्यातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकानी आज हे आंदोलन केलं.