काँग्रेस आमदाराची शेतकऱ्याला शिविगाळ आणि धक्काबुक्की

सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी जमिनीच्या वादातून शिविगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप  एका शेतक-यानं केला आहे. मुख्तार शेख सत्तार असं या शेतक-याचं नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे. ज्यात आमदार महाशय अर्वाच्च भाषेत शिविगाळ करीत असल्याचं दिसतं आहे.

Updated: Jun 14, 2017, 03:23 PM IST
काँग्रेस आमदाराची शेतकऱ्याला शिविगाळ आणि धक्काबुक्की title=

औरंगाबाद : सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी जमिनीच्या वादातून शिविगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप  एका शेतक-यानं केला आहे. मुख्तार शेख सत्तार असं या शेतक-याचं नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे. ज्यात आमदार महाशय अर्वाच्च भाषेत शिविगाळ करीत असल्याचं दिसतं आहे.

आमदार सत्तारांसोबत एक पोलीस सुद्धा दिसतोय. शेतातून हुसकावून लावण्यासाठी आमदार शिव्या देत आहेत, मारून टाकण्याची धमकी देतानाही या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीनं वागणं निश्चितच योग्य नाही.