शिवेंद्रराजे भोसले यांचं उदयनराजेंना चोख प्रत्युत्तर

...

Updated: Jun 17, 2018, 09:23 AM IST
शिवेंद्रराजे भोसले यांचं उदयनराजेंना चोख प्रत्युत्तर  title=

सातारा : स्वतः काही करायचे नाही आणि दुसरं कुणी काही करत असेल तर त्याला आडवे यायचं अशा शब्दांत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या विरोधकांवर तोंडसुख घेतलं. नुसती दाढी वाढून काही होत नसल्याचा टोला उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना लगावला. उदयनराजे भोसले यांनी लगावलेल्या टोल्याला राष्ट्रवादीचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनीही सडतोड उत्तर दिलंय.

स्पर्धा असावी तर कामाशी अशा शब्दांत शिवेंद्रराजेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. उदयनराजेंनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरही निशाणा साधलाय. आपण नसतो तर सातारा जिल्ह्यातील सर्व ऑफिसेस कराड आणि बारामतीला पळवली असती असा आरोपही उदयनराजेंनी केला होता.