तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे असे म्हणत दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.

वनिता कांबळे | Updated: Oct 24, 2023, 08:28 PM IST
तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल title=

Shiv Sena Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : 57 वर्ष झाली पंरपरा थांबू दिली नाही. मोडता घालण्याचा प्रयत्न झाला. पण मोडता मोडित काढून परंपरा कायम ठेवली आहे. यंदा खोकासूराचे दहन करणार आहोत.  तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे असं म्हणत  उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिंदे गटासह सरकारवर जोरदार निशाणा साधला. शीवतीर्थावर ठाकरे गटाच्या दसरा मेळावा आयोजीत करण्यात आला. 

प्रभू श्री रामचंद्रांनी धनुष्यबाणाने रावणाचा वध केला. भानगड नको म्हणून यांनी धनुष्यबाण देखील चोरला आहे. खोक्याची लंका दहन करणाऱ्या धगधगत्या मशाली माझ्या सोबत आहेत. सध्या क्रिकेटचा मौसम सुरु आहे. तिकडे 3 हिरो जाहिराती करत आहेत.  हे कमला पसंद वाले अशी जाहिरात करतात. तर आमच्याकडे कमळा पसंद वाले आहेत. पसंद अपनी अपनी अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारवर निशाणा साधला.

गद्दारांच्यात हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा

उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांचे अंभिनंदन केले. मनोज जरांगे पाटील यांचे उद्दव ठाकरे यांनी धन्यवाद मानले. जरांगे यांनी धनगरांनाही साथ घातली. आजचे सरकार हे डायर सरकार आहे. मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला.  मी मुख्यमंत्री असतानाही मराठा आंदोलन सुरू होते. पण कधी लाठीहल्ला झाला नाही. गद्दारांच्यात हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा. हा प्रश्न लोकसभेत सोडवावा लागेल. संसदेला तो अधिकार आहे. 

 भाजपला मोडून काढायचे आहे. भाजप कपटी, विघ्नसंतोषी आहे. भाजप, जनसंघाचा कुठलाही लढ्याशी संबंध नव्हता. जिथे जाते तिथे सत्यानाश करते. आमदार अपात्रता प्रकरण सुरू आहे. कानफट फोडले तरी गाल चोळत सांगतात की आम्ही आमचे टाईमटेबल देवू. भारतीय सर्वोच्च न्यायालयाला जुमानत नसेल तर त्याचे अस्तित्व राहणार आहे की नाही. लोकशाही टिकणार की नाही याकडं सर्वांचे लक्ष लागेल. निवडणुका लावून दाखवा. न्यायालयावर माझा विश्वास आहे.