नवी मुंबई विमानतळ भूमीपूजन कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

येथील विमानतळ भूमीपूजनाच्या आजच्या कार्यक्रमावर, शिवसेना बहिष्कार टाकणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 18, 2018, 09:43 AM IST
नवी मुंबई विमानतळ भूमीपूजन कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार title=

नवी मुंबई : येथील विमानतळ भूमीपूजनाच्या आजच्या कार्यक्रमावर, शिवसेना बहिष्कार टाकणार आहे. 

शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलले

नवी मुंबई विमानतळ भूमीपूजनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा निषेध म्हणून, आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. 

काळे झेंडे दाखवून निषेध

कार्यक्रमस्थळी काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचं, शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी सांगितलं आहे. तर ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदेही या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं सांगण्यात आलंय. 

चूक आमची नाही, केंद्राकडे बोट

दरम्यान पंतप्रधानांचा सहभाग असलेल्या कार्यक्रम पत्रिकेत नावांच्या समावेशाचा अंतिम निर्णय हा पंतप्रधान कार्यालयाकडून होत असल्याचं, राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागानं स्पष्ट केलंय.