शिर्डीत ११ फेब्रुवारीला साई इंटरनॅशनल मँरेथॉन स्पर्धा

शिर्डीत य़ेत्या ११ फेब्रुवारीला साई इंटरनँशनल मँरेथाँन स्पर्धा आयोजित केली आहे.  

Updated: Jan 24, 2018, 08:31 AM IST
शिर्डीत ११ फेब्रुवारीला साई इंटरनॅशनल मँरेथॉन स्पर्धा title=

शिर्डी : सर्वधर्मियांचे श्रध्दा स्थान असलेल्या शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यांच्यात भक्ती भावने बरेबरच आरोग्य जागुती व्हावी या उद्देशाने चँम्प एन्ड्युरन्स या संस्थेने शिर्डीत य़ेत्या ११ फेब्रुवारीला साई इंटरनँशनल मँरेथाँन स्पर्धा आयोजित केली आहे.  

यात ३, ५, १०, २१ आणि ४१ किलोमीटरचा समावेष असणार आहे. याच बरोबरीने २ किलोमीटरची अनवानी पायाने पळण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या पुर्वी चिन मध्ये १२४० स्पर्धकांनी धावत गिनीज रेकाँर्ड केले होते ते रेकाँर्ड शिर्डीत मोडण्यात येणार आहे. अहमदनगरचे माजी पोलीस अधिक्षक आय पी. एस. कृष्ण प्रकाश हेही या स्पर्धेत सहभागी होणार आहे.