11 दिवसांत साईंच्या चरणी 17 कोटींची देणगी

आजपर्यतची ही विक्रमी देणगी

Updated: Jan 4, 2020, 12:06 PM IST
11 दिवसांत साईंच्या चरणी 17 कोटींची देणगी  title=

मुंबई : सुट्टयांमध्ये अनेकजण शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जातात. तसेच नवीन वर्षाला देखील साईबाबांच्या दर्शनाने सुरूवात करतात. तर यंदाच्या नाताळ सुट्टीत आणि नव्या वर्षाची सुरूवात साईबाबांच्या दर्शनाने करतात. इथे येणारे भाविक आपल्या इच्छाशक्तीने दानपेटीत दान करतात. यंदाचं हे दान विक्रम रचणारं ठरलं आहे. 

नाताळच्या सुट्टया आणि नव्या वर्षाची सुरुवात या निमित्तानं शिर्डीतच्या साई मंदिरात ८ लाख २३ हजार भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतल आहे. सुट्टयांच्या या अकरा दिवसांत साईंच्या दानपेटीत तब्बल १६ कोटी ९३ लाखांची देणगी जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २ कोटी ८८ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. आजपर्यतची ही विक्रमी देणगी आहे. 

साईबाबा संस्थानकडे आजमीतीला २० हजार २८१ कोटींच्या ठेवी तर ४५५ किलो सोने आणि ५ हजार ५५३ किलो चांदी असुन तब्बल १० कोटींचे हिरे जमा आहेत. हा आकडा विक्रमी असून याची सगळीकडे चर्चा आहे. 23 डिसेंबर ते 2 जानेवारी या अकरा दिवसांत तब्बल 16 कोटी 93 लाख रुपयांचे दान साईंच्या चरणी अर्पण करण्यात आलं आहे. 

शिर्डी महोत्सवात ८ लाख २३ हजार ३७९ भाविकांनी बायोमेट्रिक टाइम दर्शनाचा लाभ घेतला. याच काळात साई प्रसादालयात ८ लाख ११ हजार ५८३ भाविकांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला. ७ लाख ८ हजार ७९४ लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली आणि दर्शनलाइनमधून मोफत बुंदी पाकिटे ८ लाख ९७ हजार इतकी देण्यात आली. 

२३ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२० या कालावधीतील दान

दक्षिणेपेटी : ०९ कोटी ५४ लाख ९९ हजार ६७० रुपये
देणगी काउंटर : ०३ कोटी ४६ लाख ९३ हजार ९१ रुपये
चेक, डीडीद्वारे देणगी : ०१ कोटी ५० लाख ८६ हजार १९९ रुपये
मनिऑर्डरद्वारे देणगी : ०४ लाख ६४ हजार ५९२ रुपये
डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे देणगी : ०१ कोटी ३८ लाख २७ हजार ४६४ रुपये
ऑनलाइन देणगी : ७३ लाख २९ हजार ५९० रुपये
परकीय चलनाद्वारे देणगी : २४ लाख ३६ हजार ४६३ रुपये
सोने -१२१३.६८० ग्रॅम : किंमत ४२ लाख ३१ हजार ५२२ रुपये
चांदी - १७२२३ ग्रॅम : किंमत ५ लाख ८० हजार ७६४ रुपये
एकूण देणगी : १७ कोटी ४१ लाख ४९ हजार ३५