'झाडी, डोंगर आता भरपूर झालं...' निवडणूक लढवण्याबाबत शहाजी बापूंची मोठी घोषणा

शहाजीबापू पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Updated: Oct 17, 2022, 03:32 PM IST
'झाडी, डोंगर आता भरपूर झालं...'  निवडणूक लढवण्याबाबत शहाजी बापूंची मोठी घोषणा title=

Maharashtar Politics :  काय झाडी ,काय डोंगर... या एका डायलॉगमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळवलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांची वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या एका व्यक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

श्री विठ्ठल साखर कारखान्याचे (vitthal sahakari sakhar karkhana) चेअरमन अभिजित पाटील (Abhjit Patil) यांना सांगोल्यातून आमदार करा. माझ झाडी डोंगर भरपूर झालं आहे. त्यामुळे मला विधान परिषदेवर घ्या असं जाहीर साकडं आमदार शहाजी बापू पाटील यांनी घातलं आहे.  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकरही उपस्थित होते.  नांदेडमध्ये गेलो की गर्दी, कोकणात गेलो तरी गर्दी, त्यामुळे मला तुमच्यासारखं विधानपरिषेदवर घ्या आणि अभिजितला सांगोल्यात उमेदवारी द्या, अशी जाहीर मागणी शहाजीबापू पाटील यांनी प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यासमोर केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी विधानसभा शहाजी बापू लढणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे.

2019 विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे नातू अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांचा अवघ्या काही मताने पराभव करत शहाजीबापू सांगोल्यातून विजयी झाले. पण पुढच्या निवडणुकीत त्यांना शेकापचं मोठं आव्हान असणार आहे, त्यामुळेच विधानसभेऐवजी विधान परिषदेसाठी फिल्डिंग  लावत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर (SSUBT) जोरदार निशाणा साधला आहे. दोन राऊतांनी आमचं वाटोळ केलं, माझ्यावर त्यांचा प्रचडं राग आहे, असा आरोप शहाजीबापू यांनी केला आहे. तसचं दोनही राऊतांचा निवडणुकीतील पराभव अटक असल्याचा दावाही शहाजीबापूंनी केला आहे.