सातारा : शरद पवार यांची साताऱ्यात जी भर पावसात सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीवेळी माझ्याकडून उमेदवार निवडताना माझ्याकडून चूक झाली. ती चूक मी जाहीर कबूल करतो. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की, साताऱ्यातील घराघरातील व्यक्ती ही चूक सुधारण्यासाठी येत्या २१ तारखेची वाट पाहत आहेत.
या सभेतील पवारांचं भाषण प्रचंड गाजलं, सोशल मीडियावर पवार भर पावसात भाषण करत असतानाचे फोटो व्हायरल झाले, विशेष म्हणजे सभा ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनीही मैदान सोडलं नाही. त्यांनी देखील खुर्च्या डोक्यावर घेत पवारांचं भाषण ऐकलं.
साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने, पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उदयनराजे भोसले हे यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडून आले होते, पण त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.
शरद पवार यांच्या सभेचं मुख्य आकर्षण तेच होतं की, शरद पवार उदयनराजे भोसले यांच्याविषयी काय बोलतात. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील हे मैदानात आहेत.