Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) धुरा सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा आपल्या खांद्यावर घेतली आहे. दोन दिवसाच्या नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भावनांचा आदर करत राजीनाम्याची निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं आहे. शरद पवार यांनी या निर्णयानंतर अनेकांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत अजित पवार वगळून राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्व नेते उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार आहेत कुठे? असा प्रश्न विचार जात आहे. या ठिकाणी कोण उपस्थित आहे की नाही याची चर्चा आता करु नये. अजित पवार गैरहजर असल्याचा वेगळा अर्थ काढून नका, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच अजित पवार यांना माझ्या राजीनाम्याची पूर्वकल्पना होती असंही शरद पवार यांनी म्हटलंय.
आणखी वाचा - राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम, कार्यकर्त्यांच्या हट्टासमोर माघार!
अजित पवार यांच्यावरील वक्तव्यानंतर शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केलं. भाकरी फिरवणार होतो, पण ती भाकरीच आता थांबली, असं शरद पवार म्हणताच अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. नवं पद निर्माण करण्याची गरज नाही. ज्यांना जायचं असेल त्यांना थांबवू शकत नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. अजित पवार दिल्लीला गेले ही चूकीची माहिती आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. त्याचवेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षपदावर देखील भाष्य केलंय.
दरम्यान, सुप्रिया सुळे अध्यक्ष होईल, यात तथ्य नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माझ्या निर्णयानंतर तीव्र भावना उमटली होती. जबाबदारीतून मुक्त होण्याची माझी इच्छा होती. राहूल गांधी आणि अन्य नेत्यांनी फोन करून मला विनंती केली, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हणाले आहेत.