कॉंग्रेस आणि राहुल गांधींच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून चांगलीच फटकेबाजी केली. जितके चांगले प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलेत तितक्याच ताकदीने शरद पवार यांनी त्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 21, 2018, 09:19 PM IST
कॉंग्रेस आणि राहुल गांधींच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर! title=

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून चांगलीच फटकेबाजी केली. जितके चांगले प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलेत तितक्याच ताकदीने शरद पवार यांनी त्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. 

काय विचारला प्रश्न?

या मुलाखतीतून शरद पवार यांचं कॉंग्रेस प्रेम अधिक ठळकपणे समोर आले आहे. कॉंग्रेसच्या आणि राहुल गांधी यांच्या भवितव्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला पवारांनी तितकंच चांगलं उत्तर दिलं. राज ठाकरे यांनी शरद पवार यांना कॉंग्रेस संबंधी अनेक प्रश्न विचारले. त्यात एक सर्वात महत्वाचा आणि देशाला पडलेला प्रश्न राज ठाकरे यांनी त्यांना विचारल. राज ठाकरेंनी विचारले की, काँग्रेसचं भवितव्य काय? राहुल गांधींबद्दल आजचं मत काय? 

राहुल गांधीचं भवितव्य

यावर शरद पवार यांनी जुन्या कॉंग्रेसचा संदर्भ देत उत्तर दिले की, ‘जुनी काँग्रेस आणि आजची काँग्रेस यांच्यात तफावत आहे. आज अनेक राज्य आहेत जिथं काँग्रेस नाही, अनेक जिल्हे असे आहेत जिथे काँग्रेस कमकुवत झाली आहे. पण, सध्या तरुणांत ग्राऊंड लेव्हलवर काम करण्याची तयारी दिसतेय. देश, विषय समजून घेण्याची राहुल गांधींची तयारी दिसतीये. जे आपल्याला समजत नाही ते समजून घेण्याची त्यांची तयारी दिसतीये. ती त्यांनी कायम ठेवली तर काँग्रेसला चांगले दिवस येतील... राहूल गांधींमध्ये बदल दिसतोय’. 

भाजपला पर्याय कॉंग्रेसच

तसेच ते म्हणाले की, ‘देशाच्या दृष्टीनं पर्यायी पक्ष उभा राहणं ही देशाची गरज आहे आणि आता सध्याही तो काँग्रेस आहे. हे नाकारता येणार नाही. भाजपला मजबूत पर्याय काँग्रेसचं आहे’.