ठाण्यात १०१ रुपयांत शाडूची गणेशमूर्ती

हल्ली इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे शाडूच्या मूर्तींना पसंती दिली जातेय.

Updated: Aug 23, 2017, 09:51 PM IST
ठाण्यात १०१ रुपयांत शाडूची गणेशमूर्ती title=

ठाणे : हल्ली इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे शाडूच्या मूर्तींना पसंती दिली जातेय.

इकोफ्रेंडली गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ठाण्यात अवघ्या १०१ रुपयांत शाडूच्या मूर्ती उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. नगरसेवक मुकेश मोकाशी यांच्या सहकार्याने ठाण्यातील खेवरा सर्कल येथे हा अभिनव प्रकल्प राबवला जातोय. 

अनेकदा शाडूंच्या मूर्तींची किंमत अधिक असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेतल्या जातात. यामुळे येथील गणेशमूर्तींची किंमत १०१ रुपये इतकी माफक ठेवण्यात आलीये. यामुळे शाडूच्या मूर्ती घेण्याकडे लोकांचा कल वाढेल. सहा इंचापासून दोन फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती येथे उपलब्ध आहेत.