मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत विरोधकांची राजीनाम्याच्या मागणी; पण अजित पवारांच्या भूमिकेमुळे......

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.

Updated: Dec 20, 2022, 05:12 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत विरोधकांची राजीनाम्याच्या मागणी; पण अजित पवारांच्या भूमिकेमुळे......   title=

Maharashtra Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनात(Maharashtra Winter Session 2022 ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर गंभीर आरोप झाला आहे. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी झाली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला.  यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) मुख्यमंत्री यांच्यामदतीसाठी धावून आले. तर विरोधी पक्षनेते आणि खडसे सभागृहाची दिशाभूल करत आहेत असा आरोप केला.  

नागपूर न्यासाची 83 कोटींची जमीन 2 कोटींना मुख्यमंत्र्यांनी विकल्याच्या आरोपांवरून विधानपरिषदेचं चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे आजचं कामकाज स्थगित करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांचा राजीनाम्याच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी दोन वेळा गोंधळ घातला. त्यामुळे तिस-या वेळी गोंधळ सुरू झाल्याने कामकाज स्थगित करण्यात आलं.  विरोधकांचे सर्व आरोप उपमुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळून लावले. वकिलाने मांडलेली भूमिका न्यायालयाचे ताशेरे असल्याचा विरोधकांचा बनाव असल्याचा फडणवीसांनी गंभीर आरोप केला. 

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणी वरून महाविकास आघाडीत खडाजंगी पहायला मिळाली. भूखंड विक्रीवरून उद्धव ठाकरेंननी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, अजित पवारांनी याला बगल दिल्यानं ठाकरे नाराज असल्याचे समजते.  

राजीनाम्याच्या मागणीवरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याची स्थिती समोर आली. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा या उद्धव ठाकरेंच्या मागणीला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बगल दिली. त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झालीय.

भूखंड विक्रीप्रकरणात कोर्टाने ताशेरे ओढल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागावा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडली. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि आमदार विकास निधी हे दोन मुद्दे कामकाजात लावून धरावे यावर उद्धव ठाकरे आग्रही होते.

पण, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या मुद्द्याला बगल दिल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरेंना उपसभापतींच्या दालनात ठाण मांडून आपल्या आमदारांच्या माध्यमातून विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरावा लागला.