एक लाखाची लाच घेताना रायगडमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक

रायगड पोलीस दलाला नेमकं झालाय तरी काय? खालापूरमधील एका पोलीस कर्मचाऱ्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असताना खोपोली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन जगताप याला एक लाखाची लाच घेताना ठाणे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 

Updated: Apr 5, 2018, 06:00 PM IST
एक लाखाची लाच घेताना रायगडमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक title=

रायगड : रायगड पोलीस दलाला नेमकं झालाय तरी काय? खालापूरमधील एका पोलीस कर्मचाऱ्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असताना खोपोली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन जगताप याला एक लाखाची लाच घेताना ठाणे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

खोपोली जवळील बंद कंपनीतील भंगार काढण्याच्या प्रकरणात होणारी कारवाई टाळण्यासाठी भंगार विक्रेत्याकडे राजन जगताप याने तब्बल चार लाख रुपये आणि विदेशी दारूची लाच मागितली होती.

या प्रकरणी तक्रार भंगार विक्रेत्याने ठाणे लाच लुचपत विभागाकडे केली. बुधवारी रात्री १ लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षक राजन जगतापला पकडले आहे.

राजन जगताप यांच्या घराची झडती सुरु केली आहे बँक अकाऊंट तपासणी देखील सुरु केली आहे.

जगताप हा वादग्रस्थ पोलीस म्हणून जिल्ह्यात परिचित राहिला आहे. कायम राजकारण्यांच्या सोबत उठ-बस करण्याचे अनेक आरोप जगताप याच्यावर आहेत.