शेगावचे संत शिरोमणी गजानन महाराज यांची पालखी विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली
Updated: Jul 1, 2018, 08:16 PM IST
गजानन देशमुख, झी मीडिया. हिंगोली : विठुरायाच्या भेटीसाठी आसुलेला वारकरी आषाढी एकादशी निमित्ताने आपल्या सावळ्या विठूरायाच्या भेटीला तहान भूक विसरून पंढरीच्या दिशेने निघालेत. मुखी लाडक्या विठोबाच नामस्मरण आणि आतुरतेची सिदोरी सोबत घेऊन राज्यभरातून दिंड्या पालख्या पंढरपूर ला निघालेत. शेगावचे संत शिरोमणी गजानन महाराज यांची पालखी विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली असून हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कर्हाळे गावात आगळ्या वेगळ्या पद्धतीचा पाहुणचार स्वागताला असतो.
पंढरीच्या वाटेला
सावळ्या विठुरायाच्या त्याच्या चरणी नत मस्तक होऊन विठुरायाचा पाइक होण्यासाठी वारकारी मोठ्या श्रद्धेने पंढरीच्या वाटेला लागली आहेत. राज्याच्या काणा कोपर्यातून विविध पालख्या मोठ्या हर्षो उल्हासात निघाल्या आहेत. शेगावचे संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली आहे. या पालखीचा मुक्काम गेल्या 51 वर्षापासून हिंगोली तालुक्यातील डिग्रस कर्हाळे येथे असतो. डिग्रस कर्हांळे येथील ग्रामस्थ पालखीच जंगी स्वागत आगळ्या वेगळ्या पद्दतीन करीत असतात. गजानन महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने हे गाव गेल्या 51 वर्षापूर्वी एकत्रित आल ते आजतयागत या गावात एकोपा प्रेम जिव्हाळा नांदतोय. या पालखीचा रात्रीचा मुक्काम डिग्रस कर्हाळे या गावी ठेवण्यात आला. वारकऱ्यांच स्वागत घरच्या जेवणाने व्हाव अशी इच्छा गावकऱ्यांनी व्यक्त केली. पालखीतील वारकर्यांची संख्या भरपूर असल्या कारणाने कोण्या एका ग्रामस्थाला पालखीला अन्नदान करन किंवा स्वयंपाक करण परवडणार नव्हत. प्रत्येकाच्या घरून भाज्या आणि पोळ्या मागवण्याच ठरलं. त्यामुळ या उत्साहात सारा गाव एकोप्यान सहभागी झाला आणि 10 हजार वारकर्यांच्या अन्नदानाचा प्रश्न गावकर्यांनी सहजच सोडवला. तेव्हा पासून तर आजतागायत पर्यंत चपात्या गोळा करून पाहुणचार देण्याची परंपरा सुरूच आहे. बदलत्या काळ मानाप्रमाणे यापरंपरेत आज गोड धोड जेवणाची भर पडली.
ग्रामस्थांमध्ये उत्सुकता
गावात पालखी येणार म्हटलं की सकाळ पासूनच गावातील महिला सडा सारवण करून दारात रांगोळी काढतात. दिंडी सुरु झाली तेव्हा पासून तर आज पर्यंत या गावात दिंडी कधी येणार याचीच वर्षभर ग्रामस्थांमध्ये उत्सुकता लागलेली असते. सर्व ग्रामस्थ एकत्र येउन एकोप्याने या दिंडीच जंगी स्वागत करीत असतात. माउलीच्या भेटी साठी आतुरलेल्या वारकर्याच्या सेवेत कुठलीही कमतरता राहू नये यासाठी गावातील लहान थोरापासून सगळेजण झटत असतात.साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या उक्ती प्रमाणे सर्व गाव या उत्साहात सहभागी होत
असते. महारुद्र मंदिरात होणार्या आरतीसाठी आणी पालखीच्या दर्शनासाठी लाखो भक्त जिल्हा भरातून या गावात दाखल होत असतात. आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये याच ही नियोजन ग्रामस्थ घेतात. पालखीचा निमित्ताने गावात मोठा हर्षोउल्हास बघायला मिळतो. ही परंपरा कायम टिकावी म्हणून ग्रामस्थ सतत प्रयत्नशील असतात.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.