सत्तेत आल्यावर भाजप सरकार कामगारांना विसरले- संजय राऊत

सत्तेत आल्यावर भाजप सरकार कामगारांना विसरल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

Updated: Jan 3, 2020, 06:56 PM IST
सत्तेत आल्यावर भाजप सरकार कामगारांना विसरले- संजय राऊत title=

मुंबई : सत्तेत आल्यावर भाजप सरकार कामगारांना विसरल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. 8 जानेवारीला सरकारला जागं करण्यासाठी संप असल्याचे सांगत महाराष्ट्र मुंबई बंद झाल्यास त्याचा देशावर परिणाम होईल असेही राऊत म्हणाले. 'झी २४ तास'ला त्यांनी ही माहिती दिली. 8 जानेवारीला महाराष्ट्र ताकद दाखवणार असून संप 100% यशस्वी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

भाजप सरकार 2 कोटी नोकऱ्या देणार होता पाच कोटी नोकऱ्या गेल्या. रुपया मजबूत करणार होते पण आरबीआय मधून यांनी पैसे काढले. गेल्या पाच वर्षात कष्टकऱ्यांच्या विरोधातली धोरण सरकार राबवत आहे. 2014 याच मागण्या घेऊन बीजेपी रस्त्यावर उतरली होती. महाराष्ट्रात सरकार असूनही आम्ही संपात  सहभागी असल्याचे ते म्हणाले. 8 जानेवारीच्या संपात शिवसेना सहभागी असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपमध्ये जे होतय ते इतर पक्षांना विचारून काय उपयोग ? असे म्हणत दुसऱ्यांच संघटन फुटत म्हणून उकळ्या फुटणाऱ्यातले आम्ही नसल्याचा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री बोलतील. मी आज सकाळी काँग्रेसच्या मुख्य नेत्यांशी बोललो. काँग्रेसकडून फार मोठी अडचण आहे मला वाटतं नसल्याचे ते म्हणाले. 

सगळे सार्वजनिक उद्योग बंद करून दोन पाच कुटूंबाच्या हातात दिले जात आहेत. उद्या संसद चालवायला देतील.लोकांचे मुख्य प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी जातीय धार्मिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.