मुंबई : कल्याणातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी 8 कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्याने चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्याच नावाची चर्चा आहे. मात्र आताचं कारण वेगळं आहे. (Sanjay Gaikwad 8 crore Rolls Royce owner booked in Rs 35000 electricity theft case) संजय गायकवाड यांच्या विरोधात विरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण पूर्व येथील एका इमारतीमध्ये वीज चोरीचा आरोप करत महावितरणने त्यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे .जवळपास 34 हजार 640 रुपये वीज चोरी झाल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे .महावितरणकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गायकवाड यांनी सदर रक्कम भरली असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे .तर या प्रकरणी संजय गायकवाड यांनी मात्र हे बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप केलाय माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. जर वीज चोरी झाली आहे तर मग मीटर का नेले नाही? असा सवाल त्यांनी केला आहे
वीज चोरी नसून तडजोडीच बिल होत. मीटरचा एक फेज जळाल्याने महावितरणचे अधिकरी साईड व्हीजिट करण्यास आले होते मीटरचा एक फेज बायपास असल्याचं त्यांचा निदर्शनास आले म्हणून महावितरणकडून तडजोडीच बिल आकारण्यात आलं. परंतु बिल आम्हाला मिळालं नव्हतं. माझी नाहक बदनामी केल्या प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी सांगितलं
महावितरणच्या भरारी पथकाने कल्याण पूर्व विभागातील कोळसेवाडी, आमराई तिसगाव भागात बांधकामाच्या ठिकाणी तपासणी केली. यावेळी वीजमीटर टाळून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळून आले. मार्च मध्ये ही तपासणी करण्यात आली होती. रीतसर पंचनामा करून चोरीच्या विजेचे 34 हजार 840 रुपयांचे देयक व 15 हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्याबाबत वीज वापरणाऱ्या संजय गायकवाड यांना कळवण्यात आले. मात्र पुरेसा कालावधी देऊनही वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने महावितरणने कारवाई केली. महावितरणने संजय गायकवाड यांच्याविरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीजचोरीचीतक्रार दाखल केली होती .या तक्रारी नुसार गायकवाड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांनी वीजचोरीचे 34 हजार 840 रुपयांचे देयक व तडजोडीची 15 हजार रुपयांची रक्कम त्यानी सोमवारी महावितरणकडे भरली आहे.