सांगली सामुहिक आत्महत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा, मृतदेहांजवळ सापडली चिठ्ठी

पोलिसांच्या हाती महत्ताचा पुरावा, सामुहिक आत्महत्येचा होणार उलगडा?

Updated: Jun 20, 2022, 09:05 PM IST
सांगली सामुहिक आत्महत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा, मृतदेहांजवळ सापडली चिठ्ठी title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ इथं एकच घरातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. डॉ. माणिक वनमोरे घरात सहा मृतदेह तर निवृत्त शिक्षक पोपट वनमोरे यांच्या घरात तीन मृतदेह आढळून आले आहेत. या सामूहिक आत्महत्येचा घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे. 

घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. आत्महत्या केलेल्या पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिठी सापडली असून, या चिठीत काही लोकांची नावे आणि सांख्यिकी आकडेवारी आहे. गुप्तधनाच्या मागे लागून कर्जबाजारी झाल्याने कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र आत्महत्ये नेमकं कारण आद्यप स्पष्ट झाले नाही.

मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेचे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तर वनमोरे कुटुंबीयांच्या घरातील जेवणाचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. 

आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वन (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) या नऊ जणांचा समावेश आहे.

म्हैसाळ इथल्या नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहात होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर इथं दुसरं घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं. तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.