हॉटेलच्या उधारीवरून सांगलीत पाच जणांवर जीवघेणा हल्ला

सांगली जिल्ह्यातील कारंदवाडी गावात पाच जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Updated: Dec 10, 2017, 08:38 PM IST
हॉटेलच्या उधारीवरून सांगलीत पाच जणांवर जीवघेणा हल्ला  title=

सांगली : सांगली जिल्ह्यातील कारंदवाडी गावात पाच जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्यात तीन तरुण आणि दोन महिला गंभीर जखमी झाल्यात. दहा ते पंधरा जणांच्या टोळीनं हा हल्ला केला. 

हल्लेखोरांनी तलवार, कोयता आणि काठ्यानं जबर मारहाण केली. यात तीन जणांच्या डोक्यावर वार केले असून एकाचं बोट तोडण्यात आलं. कारंदवाडीत तात्यासाहेब वग्यांनी यांचं हॉटेल असून काही दिवसांपूर्वी काही तरुण तिथं जेवणासाठी आले होते. जेऊन ते पैसे न देता गेले.

हॉटेलमध्ये जेवणाची उधारी मागितल्याचा राग मनात धरून त्या तरुणांनी सशस्त्र हल्ला केला. यात मनोज वग्यानी, सुमित वाडकर, प्रतीक पाटील, पदमजा वग्यांनी आणि सुनंदा पाटील अशी जखमींची नावं आहेत. जखमीवर सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.