सांगलीत सोळा वर्षात नऊ बिबट्यांचा मृत्यू

शिराळा तालुक्यात सोळा वर्षात नऊ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Jan 3, 2020, 07:17 PM IST
सांगलीत सोळा वर्षात नऊ बिबट्यांचा मृत्यू  title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : शिराळा तालुक्यात सोळा वर्षात नऊ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी चांदोली उद्यानात दोन आणि उद्यानाच्या बाहेर सात बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्यांचा मुक्तसंचार शेतकऱ्यांना शेतात जाताना धडकी भरणारा आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट आहेत मात्र त्यातील काही बिबटयांनी जंगला शेजारच्या ऊस शेतात आणि डोंगरात आश्रय घेतला आहे. तर जंगल सोडून बाहेर राहणारी एक बिबट्याची प्रजाती तयार झाली आहे. जंगलाबाहेर राहणाऱ्या बिबट्यांना उपयुक्त पुरेसे भक्ष्य मिळत नाही. तसेच अपघात, ह्रदयविकार आणि विषबाधा यामुळे बिबट्यांचा मृत्यू झाले आहेत. तर दुसरीकडे जंगलाबाहेर आलेल्या, बिबट्यांच्या कडून पाळीव प्राण्यांना सुद्धा लक्ष्य बनवले जात आहे.

चांदोली अभयारण्य अर्थात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या जंगल क्षेत्रात बिबटे आढळतात. मात्र बिबट्यांची संख्या वाढली की नवीन बिबटे बाहेर स्थलांतरित झाले आहेत. मुळात चांदोली अभयारण्यात या बिबट्यांना मुबलक पाणी आणि भक्ष अर्थात त्यांचा अन्न व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जंगलात बिबट्यांची संख्या जास्त झाली तर टेरेटरे अर्थात जुने बिबटे नव्या बिबट्यांना राहू देत नाहीत किंवा अधिक बिबटे एकत्र राहू शकत नाहीत त्यामुळे त्यांचे स्थलांतर होत असत. 

जंगलातून बाहेर पडल्याने त्यांच्या बछडयांचा जन्म शेतात आणि डोंगरकपारीत होतो. त्यामुळे त्यांना जंगल माहीत नसल्याने उद्याना बाहेर परिसर हेच त्यांचे आश्रयस्थान बनू लागल आहे. त्यामुळे त्यांचा वावर चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत सुद्धा होत आहे. अन्नाच्या शोधात फिरत असताना त्यांच्याकडून पाळीव प्राण्यांना सुद्धा लक्ष बनवले जात आहे.

बिबटे जंगलातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आसपासच्या शेतात डोंगर कपाऱ्यात आपलं आश्रयस्थान बनवल आहे. जंगल सोडून बाहेर वनक्षेत्र कमी आहे, त्या ठिकाणी त्यांना आवश्यक भक्ष उपलब्ध नसतं. त्याचबरोबर ताकतवान वन्यप्राण्यांच्या कडून सुद्धा त्यांच्यावर हल्ले होतात. पर्यायाने ते नागरी वस्तीत सुद्धा येत आहेत. त्याच बरोबर बिबटे हे जंगलाच्या सभोवताली राहत असतात, भक्ष्याच्या शोधत ते ऊस शेती आणि मानवी वस्तीकडे वळत आहेत. तसेच कुत्रे हे बिबट्याचे अवढते भक्ष्य असल्याने ऊस शेतात बिबट्यांचा मुक्काम असतो.

बिबटे नागरी वस्तीत आल्यामुळे मांगरुळ, बिळाशी, वाकुर्डे, वेळापूर, कुसळवाडी, मांगले, बेर्डेवाडी या परिसरातील पाळीव प्राण्यांच्या वर त्यांच्याकडून हल्ले होत आहेत. गादेगाव येथे बिबट्यांच्या बछड्याचा मृत्यू झाला. मे महिन्यात शेळकेवाडी खुजगाव दरम्यान असलेल्या वारणा शेती वरून पडून बिबट्याचा मृत्यू झाला होता 14 सप्टेंबर 2004 ला खेड तालुक्यातील आनिमेटा, येथून चांदोली राष्ट्रीय उद्यानात शोधण्यात आलेल्या नर जातीच्या बिबट्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यापूर्वी चव्हाण वाडी येथील जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. 2016 वाकाईवाडी येथे विषबाधा झाल्याने, 2 बिबटे मयत झाले होते. तर वाकुर्डे खुर्द येथील सवादकर वाडी येथील शेतात अन्नसाखळी तुटल्याने एक बिबट्या मृतावस्थेत आढळला.1 जानेवारी 2015 ला कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत धुमाकूळ घातलेला बिबट्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वाकड कधी गेली पण येथे महामार्गावर बिबट्या मृतावस्थेत आढळल्याचे ग्रामस्थ सांगतात.

चांदोली राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडलेले बिबटे पुन्हा उद्यानाकडे न फिरकल्याने उद्याना बाहेरील परिसर हेच त्यांचे आश्रय स्थळ बनले आहे. त्यामुळे त्यांना होणारी बछडी ही याच परिसरात असणाऱ्या पाऊस आणि छोट्या छोट्या जंगलात आहेत. परंतु हे असले स्थळ पुरेसे नसल्याने ते नवीन स्थळ आणि अन्नाच्या शोधात भटकत आहेत. त्यामुळे विविध भागात बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्या दिसला तर काय करावे या बाबत प्रबोधन करून लोकांच्या मनात असणारी त्यांच्याविषयीची भीती दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिराळाचे वनक्षेत्रपाल एस आर काळे यांनी 'झी २४ तास' ला सांगितले.

जंगला बाहेर राहणाऱ्या बिबट्याचा नव्या प्रजातीचा विचार करता, बिबट्यांची सुरक्षितता आणि नागरिक आणि पाळीव प्राणी यांच्या सुरक्षितते बाबत योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे.