धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ

Aurangabad News: संभाजीनगरमध्ये मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. 

Updated: Dec 5, 2022, 10:35 AM IST
धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ title=
women was stripped and beaten in gangapur

Sambhajinagar Crime News : संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नातवाने मुलगी पळवली म्हणून त्याच्या आजीला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. एवढंच नाही तर त्या मारहाणीचा व्हिडिओसुद्धा बनवण्यात आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.    

संभाजीनगरमधील (Sambhajinagar Crime News) वझर गावात  मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करत आरोपींकडून हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल देखील करण्यात आला आहे.  विवेक उर्फ चवल्या पिंपळे (Chavalya Pimple) याच्यासह दोघांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. गंगापूर फाट्यावर ही महिला राहते. तीच्या नातवाने मुलीला पळवून आणलं असा आरोप करत सदर आरोपी घरी आला. आणि या वृद्ध महिलेला विवस्त्र करुन मारहाण (Elderly woman stripped and beaten) केल्याचा आरोप आहे. गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय.    

वाचा: Google Chrome वापरत असाल तर सावधान! 

विवस्त्र करून मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील गंगापूर फाट्यावर ( Gangapur Phata in Gangapur Taluka of Sambhajinagar) असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान वृद्ध महिलेला ओझर येथील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. संतापजनक म्हणजे महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला विवस्त्र करत मारहाण करण्यात आली. यावेळी पीडित वृद्ध महिला हात जोडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र आरोपींना तिच्यावर दया आली नाही. 

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

माझ्या मुलीला तुझ्या नातूने पळून नेलं म्हणून, वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्या महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ करून समाज माध्यमांवर व्हायरल सुद्धा केला. (video viral)