आईनेच केला घात! मुलगी साखरझोपेत असताना अंगावर पेट्रोल ओतून पेटवले, धक्कादायक कारण समोर

Sambhajinagar Crime: माझ्याच अंगावरील गोधडीला आग लागलेली दिसल्याने मी जोराने ओरडून गोधडी फेकून दिली. भावाच्या मदतीने घराच्या खालच्या मजल्यावर पळत गेले, असे पीडितेने सांगितले. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 24, 2023, 03:21 PM IST
आईनेच केला घात! मुलगी साखरझोपेत असताना अंगावर पेट्रोल ओतून पेटवले, धक्कादायक कारण समोर  title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर: आई आणि मुलीच्या नात्याला कलंक लावणारी घटना संभाजीनगरहुन समोर आली आहे. येथे घडलेल्या एका घटनेत मुलगी साखरझोपेत असताना आईनेच तिच्या गोधडीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. एखादी आई असं कसं करु शकते असे प्रश्न? सर्वांना पडला आहे. पण यानंतर एक धक्कादायक कारण समोर आले आहे. 

पिडीत तरुणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिने आपल्या आईविरोधात 21 ऑगस्टला सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.  यानुसार, 17 ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास मी झोपेत होते आणि माझ्या अंगावर गोधडी होती. या गोधडीवर आईने पेट्रोल टाकले आणि ती पेटवून दिली. यातून मला मारुन टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे पिडीत तरुणीने पोलिसांना सांगितले. 

आगीने भाजल्याने मला जाग आली. मी आरडाओरडा सुरु केला. माझी आई तेथेच उभी असलेली मला दिसली. तिने मला कसलीही मदत केली नाही. माझ्या आवाजाने खालच्या मजल्यावर झोपलेला माझा भाऊ प्रसाद हा पळत माझ्याकडे आला आणि त्याने त्याच्याकडे असलेल्या गोधडीने माझ्या अंगाला लागलेली आग विझविली. आग विझल्यानंतर मी माझ्या आईला घडलेल्या प्रकाराबाबत विचारले. यानंतर तिने सांगितलेला प्रकार खूपच धक्कादायक होता असे पिडीतीने सांगितले. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा

सोमवारी पहाटे 4.30 च्या सुमारास झोपेत असताना मला पेट्रोल आणि जळाल्यासारखा वास येत असल्याने मी माझ्या अंगा-तोंडावर घेतलेली गोधडी उघडी करून बघितली. यावेळी माझ्याच अंगावरील गोधडीला आग लागलेली दिसल्याने मी जोराने ओरडून गोधडी फेकून दिली. भावाच्या मदतीने घराच्या खालच्या मजल्यावर पळत गेले, असे तिने सांगितले. 

याबद्दल आईला विचारले असता मला तांत्रिकाने असे करायला सांगितल्याचे तिचे म्हणणे होते.  तू तुझ्या मुलीला जिवंत मारून टाकल्यास तुला धनलाभ होईल तसेच तुझ्या मुलाचे चांगले होईल, असे मिसारवाडी येथे राहणारी शकुंतला अहिरे हिने मला सांगितल्याचे आईने म्हटले. 

त्यावरून मी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी निघाले असता तिने मला येऊ दिले नाही. सोमवारी आई घरी नसल्याने मी पोलिसात तक्रार देत असल्याचे पिडीतेने म्हटले.

गर्लफ्रेंडला लॉजवर घेऊन गेला नागपूरचा बॉयफ्रेंड, सकाळी झाला मृत्यू; 'हे' होतं कारण!

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक शकुंतला अहिरे आणि आई पार्वती हुलमुख यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कुणालाही अद्याप अटक करण्यात आली नाही.

आई मिसारवाडी येथील शकुंतला अहिरे या महिलेकडे जादूटोण्यासाठी जात असल्याचे आणि तिच्या सल्ल्याने धनलाभासाठी आईने आपल्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीने केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.