संभाजी भिडेंचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

Updated: May 30, 2018, 12:04 AM IST

मुंबई :  नेहमीच आपल्या प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संभाजी भिडेंनी धुळ्यात पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून खळबळ माजवून दिली आहे. मनूने जगाला पहिली घटना दिली असून त्याच्या सावली जवळ जाण्याची लायकीसुद्धा आपली नसल्याचं भिडे गुरुजींनी धुळ्यातील सैनिक भवनात पार पडलेल्या सभेत सांगितले.

मनुस्मृतीचे नाव मानवधर्मशास्त्र असून अनेकांना मनूवर टीका करण्यात आनंद मिळत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. निधर्मीपणा हा नालायकपणा आहे. सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता या संकल्पना थोतांड असून या संकल्पनांची त्यांनी चांगलीच टर उडवली. जगातील सर्व शास्त्रांचा जन्म भारतात झाला असून सर्व तत्त्वज्ञानाचा उगम भारत असल्याचे सांगत त्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही यावेळी केले.