उसाला चांगला भाव न मिळाल्यास रस्त्यावर उतरणार- सदाभाऊ खोत

बाजार पेठेत साखरेला चांगला दर आसल्यानं शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशी भूमिका राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतलीय.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 18, 2017, 11:40 PM IST
उसाला चांगला भाव न मिळाल्यास रस्त्यावर उतरणार- सदाभाऊ खोत title=

कोल्हापूर : बाजार पेठेत साखरेला चांगला दर आसल्यानं शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशी भूमिका राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतलीय. मात्र  शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळाला नाही तर रयत क्रांती संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा राज्याचे कृषी मंत्री सदाभाउ खोत यांनी दिलाय. कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत मांडलय.

उसाचा गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकरी संघटना आणि कारखानदार यांची सहकार मंत्र्यांनी एकत्रित बैठक घेऊन ऊस दरावर सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती करणार आसल्याचही सदाभाऊ खोत यानी म्हटलय.