Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर याची पुन्हा ताडोबा सफर

Sachin Tendulkar at Tadoba : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा नागपुरात दाखल झाला आहे.  

Updated: Sep 4, 2021, 11:44 AM IST
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर याची पुन्हा ताडोबा सफर title=
Pic Courtesy : twitter@sachin_rt

नागपूर : Sachin Tendulkar at Tadoba : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा नागपुरात दाखल झाला आहे. सचिन नागपूर विमानतळावर पोहोचला असून आता तो ताडोबाला रवाना झाला आहे. सचिन कुटुंबासह ताडोबा सफारीची तयारी करत आहे. (Sachin Tendulkar again with his family enjoys safari at Tadoba near Nagpur)

ताडोबाच्या चिमूर भागातील एका खासगी रिसॉर्टमध्ये सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांचे वास्तव्य असणार आहे. सचिनने अनेकवेळा ताडोबा जंगल सफारी केली आहे. यापूर्वी सचिन कुटुंबीयांसह उमरेड कऱ्हाडला आणि ताडोबा येथे सफारीसाठी मुक्कामी होता.

सचिन तेंडुलकर नेहमीच ताडोबाला जात असतो. याआधी त्यांने यावर्षी 24 ते 27 जानेवारी दरम्यान चार दिवस ताडोबा येथे मुक्कामी होता. या दरम्यान घेतलेल्या अनुभवाचा व्हिडिओ त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात सफारी करताना झालेले वाघांचे दर्शन आणि या अनुभवाचे वर्णन करताना सचिन दिसला आहे.