नाशिक कारागृहाबाहेर खरेदीसाठी झुंबड

कैद्यांनी स्टॉल लावून सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

Updated: Oct 28, 2019, 03:46 PM IST
नाशिक कारागृहाबाहेर खरेदीसाठी झुंबड title=

नाशिक : ऐरवी खरेदीसाठी आपण मॉल किंवा बाजारातली गर्दी नेहमीच अनुभवतो. पण नाशिक कारागृहाबाहेर खरेदीची झुंबड उडाली आहे.  नाशिकच्या कारागृहातील कैदी कधी गणपती, तर कधी पैठणी विणल्यानं चर्चेत असतात. यंदा मात्र या कलाकार कैद्यांनी एक दोन नव्हे तर फर्निचर, सतरंज्या, पैठणी, जॅकेट, चौरंग, मूर्ती, उटणे, साबण, चामड्याच्या वस्तू, फिनेल, बेकरी पदार्थ असे स्टॉल लावून सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. 

पहिल्याच दिवशी कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची पावणेदोन लाखांची उलाढाल केली. शिक्षा भोगत असतांनाही कारागृह प्रशासन कैद्यांच्या कलेचा वापर करुन घेत आहे हे विशेष. या गृहोपयोगी वस्तूंचा स्टॉल उभारल्यानं कमी पैशात चांगल्या वस्तू मिळत असल्यानं या ग्राहकांनीही उपक्रमाचं स्वागत केलं जातं आहे.