पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना चांगलच अडचणीत ठरलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सातारा शहर पोलिसांनी बंडातात्या यांच्यावर कारवाई करून त्याचा अहवाल दोन दिवसात राज्य महिला आयोगाला सादर करावा. तर, बंडातात्या यांनी ४८ तासात लेखी खुलासा राज्य महिला आयोगाला द्यावा असे निर्देश दिलेत.
बंडातात्या करंदीकर यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आक्रमक झाल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या महिला आक्रमक नेत्या नगरसेविका ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात खटला दाखल केलाय.
बंडातात्या कराड यांनी राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याची न्यायालयाने दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करण्याची मागणी करण्यात आलीय. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार, ॲड. दिग्विजयसिंह ठोंबरे व विष्णू होगे काम पाहत आहे.