Pune News : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आधीच वातावरण तापलेलं आहे. अशातच आता प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं (Ramdev Baba Statement on Women Clothes) आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) मंचावर असताना रामदेव बाबांनी वक्तव्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (NCP Rupali Patil) यांनी निशाणा साधला आहे. (Rupali Patil on baba Ramdev controversial statement latest marathi news)
रामदेव बाबांच्या मेंदुला रक्तपुरवठा कमी होतोय त्यांच्या वक्तव्यावरून कळलं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमृता फडणवीस मंचावर उपस्थित होते. महिलांनी साडी, सलवार घालणे इथपर्यंत ठीक होतं पण पुढचं विधान कितपत योग्य याचा विचार करायला हवा. अमृता फडणवीसांनी तेव्हाच बाबा रामदेव यांच्या कानाखाली मारायला हवी होती, असं म्हणत रूपाली पाटील ठोंबरे यांनी रामदेव बाबांवर टीका केली आहे.
अमृता फडवणीस वहिनी रामदेव बाबांच्या व्यक्तव्यावर हसून दाद देण्यापेक्षा
सणसणीत कानाखाली मारली असती तर महिलांना
उपमुख्यमंत्री साहेबांच्या पत्नी सक्षम पणे महिलांच्या सक्षमते साठी,सुरक्षेसाठी आहातत याची खात्री झाली असती.
महिलाच महिलेचा सन्मान वाढू शकते.
राम्या बाबांचा जाहीर निषेध.— Rupalipatilthombare (@Rupalispeak) November 25, 2022
बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही, रामदेव बाबा डोकं खाली पाय वर करा म्हणजे तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल, असंही रूपाली पाटील म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील हायलँड मैदानामध्ये हा कार्यक्रम आयोजत करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांसह आमदार रवी राणा, श्रीकांत शिंदे, अमृता फडणवीस आणि दीपाली सय्यद उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात महिलांसाठी योगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र योगानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांना त्यांनी योगासाठी घातलेले ड्रेस बदलता आले नाहीत. योगा कार्यक्रमानंतर महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. याबाबत बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, "साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, महिला सलवार सूटमध्येसुद्धा चांगल्या वाटतात आणि माझ्यासारखे काही नाही घातलं तरी चालते.