रोबोटलाही कळलं स्वच्छतेचं महत्व, चक्क शहरातल्या नालेसफाईचं काम घेतलं हाती... पाहा 'हा' व्हायरल video

हल्ली नालेसफाई (Drainage) हा भाग सगळीकडेच महत्त्वपुर्ण ठरला आहे.

Updated: Nov 8, 2022, 04:50 PM IST
रोबोटलाही कळलं स्वच्छतेचं महत्व, चक्क शहरातल्या नालेसफाईचं काम घेतलं हाती... पाहा 'हा' व्हायरल video title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर: सध्या सगळीकडेच स्वच्छतेचे ((Cleaning) महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक शहरात महानगरमालिकाही मनापासून स्वच्छतेची मोहिम राबवते आहे. काही ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेऊन लोकांची जनजागृती केली जाते. त्यामुळे हल्ली सगळेच जण आपापल्या शहरात(City) स्वच्छता मोहिम राबवत आहेत. (Robot cleaning drains in Ulhasnagar in municipality in Thane district)

हल्ली नालेसफाई (Drainage) हा भाग सगळीकडेच महत्त्वपुर्ण ठरला आहे. मॅन होल्समुळे (Man holes) अनेकांचे जीवही गेले आहेत. त्यामुळे नगरपालिका वेळोवेळी याकडे लक्ष देते आहे. यंदा उल्हासनगराच्या नालेसफाईची जबाबदारी माणसांसोबत एका रोबोनंही घेतली आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

उल्हासनगर  शरीरातील नालेसफाई आता रोबोट करतोय, आता महापालिका (Municipal) अत्याधुनिक प्रणालीच्या सहाय्याने चेंबर आणि भुयारी गटारामधील घाण साफ केली जात आहे. एरवी सफाई कामगारांच्या माध्यमातून नाले सफाई करतांना  दुर्घटना होऊन जीवित हानी झाली आहे. मात्र आता रोबोटच्या सहायाने शहारातील नालेसफाई केली जाणार असल्याने अशा प्रकारची कुठलीही दुर्घटना टळणार आहे. 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

किती तास करतो हा रोबोट काम? 

महापालिकेच्या एकूण 4 प्रभागातील सफाई हा रोबोट करत असून 5 जणांचे काम हा एकटा रोबोट करतो. सफाई कामगारांना एक चेंबर साफ करतांना साधारणतः दोन ते तीन तास लागतात ते काम  रोबोट 1 तासात करतो.सध्या महापालिकेकडून दोन रोबोट सफाई करत असून अजून दोन रोबोट दाखल होणार आहेत.