पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा-बलात्कार प्रकरण; आतापर्यंत पाच आरोपी अटकेत, तीन फरार आरोपींचा शोध

.रात्री उशिराने आणखी एक आरोपीला घोटी येथून अटक करण्यात आली आहे.

Updated: Oct 10, 2021, 01:13 PM IST
पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा-बलात्कार प्रकरण; आतापर्यंत पाच आरोपी अटकेत, तीन फरार आरोपींचा शोध  title=

कसारा : लखनऊ मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये दरोडा आणि बलात्कार प्रकरणी काल कल्याण लोहमार्ग पोलिसांनी चार आरोपीना अटक केली होती .उर्वरित फरार चार आरोपींचा शोध रेल्वे पोलीस घेत होते .रात्री उशिराने आणखी एक आरोपीला घोटी येथून अटक करण्यात आली आहे. काशिनाथ उर्फ काश्या तेलंग अस या आरोपीचे नाव असून पोलीस फरार तीन आरोपींचा शोध घेत आहेत .

धावत्या लखनऊ - मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये एका टोळीने दरोडा टाकला होता. (Robbery on Pushpak Express) त्यांनी अनेक प्रवाशांची लुटमार केली. यावेळी दरोडेखोरांनी एका 20 वर्षीय महिलेवर बलात्कारही केला. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना इगतपुरी स्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी 4 जणांना अटक केली  होती. उर्वरित फरार चार आरोपींचा शोध रेल्वे पोलीस घेत होते .रात्री उशिराने आणखी एक आरोपीला घोटी येथून अटक करण्यात आली आहे. 

लखनऊ - मुंबई पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकादरम्यान येत असताना हा दरोडा टाकण्यात आला होता. 7 ते 8 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटले. दरम्यान त्या नराधमांनी एका महिलेवरही बलात्कार केला. ही घटना इगतपुरी - कसारा स्थानकादरम्यान घडली होती.