पुणे : पुण्याच्या कात्रज घाटातील रस्त्याचं काम अखेर सुरु झालय. हा पुणे कोल्हापूर राज्य महामार्ग आहे. मात्र खड्ड्यांमुळे त्याची दुरवस्था झालीय. राज्यातील सर्व महामार्ग १५ डिसेंबरपूर्वी चकचकीत करण्याची घोषण सार्बांवजनिक बांधकाम मंत्र्यांनी केली होती. तरीदेखील हा रस्ता दुरुस्त झाला नव्हता. त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना होत होता.
अवघ्या दिड किलोमीटर अंतरात वारंवार अपघात व्हायचे. रस्ता दुरुस्त व्हावा या मागणीसाठी स्थानिक नागरिकांकडून पाठपुरावा सुरु होता. झी २४ तासने या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे.