नागपूर : नागपूर शहराध्यक्ष म्हणून प्रवीण दटके यांची पुन्हा निवड झाली आहे. अरविंद गजभिये यांची नागपूर जिल्हा भाजपध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. याधी राजीव पोतदार नागपूर जिल्हा भाजपाध्यक्ष होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रात आपले राज्य येऊ शकले नाही. जिल्हा परिषदेत अपेक्षित यश मिळाले नाही. अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
पुढे गडकरी असं म्हणाले की,'या ज्या निवडणुका झाल्या त्यात विधानसभा निवडणुकीत आपल्याला यश मिळालं. या निवडणुका आपण भाजप-शिवसेना आणि मित्र एकत्र लढलो.105 जागा भाजपला मिळाल्या शिवसेनेला 56 जागा मिळाल्या.त्यामुळे आपल्याला युती म्हणून निर्विवाद बहुमत मिळालं.. त्यामुळे आपला पराभव झालं असं कोणी म्हणत असेल तर ते मला मान्य नाही.'
मात्र मिळलेल्या यशनानंतर निवडणूक लढत असताना आपल्या सोबत लढणा-यांनी निवडणूक झाल्यानंतर आपला साथ सोडून दिला. विचारांशी एकप्रकारे विश्वासघात करत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे आपल्याला पराजय मिळाला नाही, मात्र विश्वासघात मिळाला. निवडणुकीत जय पराजय होत असतात. एक पार्टी म्हणुन आपण नागपुरात ताकतवर आहे
आपला पक्ष लोकशाही पक्ष आहे. ज्या पक्षात निवडणुकाच होत नाही. तो पक्ष लोकशाहीद्वारे कसा हा प्रश्न आपल्यासमोर आहे. आपला पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपल्या पक्षात मुलगा, पत्नी म्हणून पद मिळत नाही. या पक्षाचे मालक कार्यकर्ते आहेत. आपल्या सामर्थ्याच्या भीतीमुळे एकमेकांचे चेहरे न पाहणारे एकत्र आले. 51 टक्के पेक्षा जास्त ताकत वाढवायची आहे. तुम्ही सगळे एकत्र या आम्ही वेळ देतो आम्ही तुम्हाला पट्टी देऊ. निवडणुकीत जय पराजय होत असतात. एक पार्टी म्हणून आपण नागपुरात ताकतवर होतो.