नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर

बहुचर्चित सुरगाणा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराला समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. 

Updated: Feb 15, 2022, 07:45 PM IST
नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायती नगराध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक नगरपंचावतींवर विजय मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 2 ठिकाणी संधी मिळाली तर भाजपला 1 जागेवर समाधान मानावे लागले.

- बहुचर्चित सुरगाणा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराला समसमान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. ज्यामध्ये शिवसेनेचे भरत वाघमारे विजयी झाले तर उपनगराध्यक्षपदी माकपच्या माधवी थोरात यांचा विजय झाला.

- कळवण नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे कौतिक पगार यांची नगराध्यक्षपदी तर हर्षाली पगार यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

- देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती आहेर तर उपनगराध्यक्षपदी जितेंद्र आहेर यांची बिनविरोध निवड झाली.

- पेठ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीचे करण करवंदे यांची तर उपनगराध्यक्षपदी माकपच्या अफरोजा शेख विजयी झाल्या..

- निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या रुपाली रंधवे तर उपनगराध्यक्षपदी अनिल पाटील कुंदे यांची बिनविरोध निवड झाली..

- दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मेघा धिंदळे तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अविनाश जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.