विशाल करोळे, औरंगाबाद : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपचा हंगाम आता वाया जाण्याच्या मार्गावर आहे. शेतक-यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकलं आहे.
पैठण तालुक्यातील ढाकेफळ गावचे उत्तम भागवत यांची 5 एकर जमीन आहे. त्यावर त्यांनी तुरी आणि कापूस लावला होता. जून महिन्याच्या सुरुवातला चांगला पाऊस आला. त्यामुळे त्यानी उत्साहात पेरणीसुद्धा केली. मात्र पुन्हा एकदा निसर्गाने धोका दिला आणि जून महिन्यानंतर पावसाने दड़ी मारली, ती अजतगायत कायम आहे. जे पीक जुलै महिन्यात 3 फुट वाढयला हवं होतं. त्या पिकांनी अजूनही जमीन सोडली नाही. पेरणीसाठी कसाबसा पैसा जमावला होता. आता दुबार पेरणी करावी लागेल या कल्पनेन उत्तम राव हदारले आहेत.
याच गावच्या शैख़ जमादार यांची तर भागवत यांच्या पेक्षा बिकट अवस्था आहे. कसे तरी व्याजने पैसे आणले आणि पेरणी केली. मात्र जामिनीतून काही बाहेरच आले नाही. जमादार कधी जमिनीकडे तर कधी आकाशकडे डोळे लावून बसतात. खरीप वाया गेला आता पाऊस आला तरी फायदा नाही, असं हताशपणे सांगतात.
ही परिस्थिति फक्त औरंगाबाद पूरती नाही तर संपूर्ण मराठवाड़्यात गंभीर परिस्तिथी निर्माण झाली आहे. औरंगबाद विभागात 78 टक्के पेरणी झाली आहे तर लातूर विभागात फक्त 45 टक्के पेरणी झाली आहे. जुलै महिन्यातील ही परिस्तिथी वाईेट आणि दुर्दैवी आहे. ही पुन्हा दुष्काळाची चाहुल तर नाही ना हीच भीती आता शेतकऱ्यांना वाटत आहे.