रेमडेसिविर काळाबाजारप्रकरणी पहिली शिक्षा... 3 वर्ष सश्रम कारावास

रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणी सत्र न्यायालयानं एकाला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.हा खटला तीन महिन्यात निकाली निघाला

Updated: Jul 24, 2021, 10:03 AM IST
रेमडेसिविर काळाबाजारप्रकरणी पहिली शिक्षा... 3 वर्ष सश्रम कारावास title=

 

नागपूर :  रेमडेसिविर  इंजेक्शन काळाबाजार करणाऱ्या आरोपी तरुणाला विशेष न्यायालयाने तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार घटनांमधील हा पहिला निर्णय असून सुमारे तीन महिन्यात हा निकाली निघाला. नागपुरातील याप्रकरणातील ही पहिली शिक्षा आहे. राज्यातील ही पहिली शिक्षा असलण्याची शक्यता आहे

                   महिंद्रा रंगारीवर रेमडेसिविर  इजेक्सशनचा काळाबारचा आरोप लावण्यात आला होता. क्रीडा चौकातील ओजस कोविड सेंटरमध्ये  कार्यरत असताना 17 एप्रिल 2021 रोजी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचे रेमेडीसिविर इंजेक्शन महेंद्रनं चोरले होते. त्याची ही चोरी सीसीटीव्ही चित्रित झाला होती. तसेच चोरी गेलेले रेमडीसिविर इंजेक्शन त्याच्याजवळ सापडले.त्यानंतर  कोविड सेंटरचे व्यवस्थापक अशोक बिसेनं यांनी यांनी रंगारी विरुद्ध इमामवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यावेळी दुस-या लाटेतील कोरोनाचा सर्वोच्च बिंदूवर होता.अशावेळी रेमडेसिविर इंजेक्शन अनेक रुग्णांसाठी जीवनावश्यक झाले होते. त्याचाच गैरफायदा करत काहीजण रमेडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करत होते. अशा असामाजिक तत्वाविरुद्ध कारवाईची मागणी होत.याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.जनहित याचिका सुनावणीदरम्यान हा मुद्दा चर्चेला आला.यावर न्यायालयाने काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.त्यानुसार न्यायालयाने काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.त्यानंतर काळाबाजार करणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. पुढे सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणांचे खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात आणावेत असेही आदेश दिले होते.

      याप्रकरणी  मुख्य न्यायदंडधिकारी एस.बी पवार यांच्या समक्ष सुनवाणी झालीय.खटल्यात 12 साक्षीदार तपासण्यात आले.सरकारतरर्फे ऍड ज्योती वजानी यांनी बाजू मांडली. मुख्य न्यायदंडाधिकारी एस.बी. पवार यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.