मुंबई : Maharashtra Rain News : कोकणमधील रायगड, रत्नागिरीसह कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांत 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट तर मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील जिल्ह्यातील नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यात 14 जुलैपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. हा रेड अलर्ट विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंट अलर्ट दिलाय. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कमालाची वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत 'मुसळधार' ते 'अत्यंत मुसळधार' पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्यानेही ऑरेंज अलर्ट जारी केला दिला आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत संततधार पाऊस आणि त्याच्याशी संबंधित घटनांमुळे किमान नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र एसडीएमडीच्या म्हणण्यानुसार, 1 जूनपासून एकूण 76 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि राज्यात पावसाशी संबंधित घटनांमुळे तब्बल 838 घरांचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पाऊस आणि संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात तीन जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे, तर मुंबई आणि त्याच्या लगतच्या भागात सोमवारी हलक्या सरी कोसळल्या. आज सकाळपासून तुरळक पाऊस होत आहे.
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून त्यामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून गोदावरी नदीच्या काठावर असलेली अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. IMD ने नाशिक जिल्ह्यासाठी 14 जुलैपर्यंत 'रेड' अलर्ट जारी केला असून, 24 तासांत 20 सेमीपेक्षा जास्त मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात, गेल्या तीन दिवसांत तीन जण ओसंडून वाहणाऱ्या नाल्यात वाहून गेले आणि नंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, असे जिल्हा माहिती कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. गडचिरोलीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित 129 ठिकाणच्या 353 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे सर्वाधिक 238.8 मिमी, त्याखालोखाल पेठ येथे 187.6 मिमी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 168 मिमी पाऊस झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.