Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी होणार की नाही, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल - उदय सामंत

Barsu Refinery Project Protest : बारसू रिफायनरी प्रकल्प होणार की नाही, हे नंतर ठरणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर कंपनी याबाबत आपला निर्णय घेणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, विरोध कोण करतोय आणि त्यांना कोण भडकवत आहे, हे सगळ्यांना माहित आहे, असे ते म्हणाले.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2023, 12:30 PM IST
Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी होणार की नाही, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल - उदय सामंत title=

Barsu Refinery Project Protest : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील बारसू रिफायनरी प्रकल्प होणार की नाही, हे नंतर ठरणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर कंपनी याबाबत आपला निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता विरोध करणे चुकीचे आहे, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, विरोध कोण करतोय आणि त्यांना कोण भडकवत आहे, हे सगळ्यांना माहित आहे. बारसूत असे कोणतेही दडपशाहीचे वातावरण नसून आंदोलक आक्रमक व्हावेत म्हणून वक्तव्य केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, पत्रकारांना आडकाठी करण्यात येत नाही. एकाने उलट सुटल प्रश्न विचारुन लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला तेथून निघून जाण्यास सांगण्यात आले, असे सामंत म्हणाले.

लोक आंदोलन करणे हे चुकीचे आहे -  केसरकर

खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या भीतीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र बोलण्यास नकार दिला आहे. बारसूत असं कोणतंही दडपशाहीचं वातावरण नसून आंदोलक आक्रमक व्हावेत म्हणून वक्तव्य केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे रिफायनरी आंदोलनाबाबत मंत्री दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोक आंदोलन करतायत हे चुकीचं आहे, रिफायनरीबाबत आंदोलकांचा गैरसमज दूर करु. हा प्रकल्प पूर्ण ग्रीनरी आहे. त्यामुळे सर्वांना फायदा होईल. याचा आंबा, काजू पिकांवर परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया केसरकरांनी दिली आहे.

बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटला, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

रिफायनरी विषयी अगोदरच्या सरकारने लोकांपर्यंत माहिती पोहचवण गरजेचं होत आता आम्ही योग्य माहिती पोहचवत आहोत. लोक आंदोलन करतायत हे चुकीचं आहे हा आंदोलनाचा मार्ग नाही, गाडीखाली झोपणं हे योग्य नाही. आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही याची काळजी घेत आहोत. हा पूर्ण ग्रीनरी प्रकल्प आहे त्यामुळे सर्वांना फायदा होईल. माझ्या खात्याच्या अंडर हा प्रकल्प येत नाही, त्यामुळे मी जास्त बोलणं योग्य नाही. समृद्धीला देखील कोण विरोध करत होत सर्वांना माहिती आहे त्याचे फायदे आता दिसतायत, असे केसरकर म्हणाले.

आंदोलन करणाऱ्यांना धमकावलं जात आहे - राऊत

बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन करणा-यांना धमकावलं जात आहे. बारसूत पोलीस दडपशाही करत असून तिथे जालियानवाला हत्याकांड होण्याची भीती खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारसूत घटनास्थळी जावं, असं आवाहनही राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, बारसू येथे सकाळपासून सुरु असलेल्या परिस्थितीचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे.  उद्धव ठाकरे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडून माहिती घेतली आहे. त्यामुळे आता ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. ठाकरे गट स्थानिकांसोबत असल्याचे याआगोदरच ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे.