Mumbai Goa Highway: चुकीचा कंत्राटदार दिल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर आणखी दोन वर्ष हा महामार्ग रखडणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. चुकीच्या ठेकेदारामुळे मुंबई गोवा महामार्ग आणखी दोन वर्ष रखडणार अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे. कोकणात जाणारे रस्ते चांगलेच आहेत. पूल आणि त्याच्या आजूबाजूला असणारा सर्व्हिस रोड यामुळे थोडे अडथळे येत आहेत असं रवींद्र चव्हाणांनी सांगितलं आहे.
"एखादा कंत्राटदार चुकला आहे. तीन कंत्राटदारांनी चुकीचं काम केल्याने या प्रोजेक्टबद्दल परिस्थिती निर्माण झाली आहे. एक गेला, म्हणून दुसरा दिला पण तोही तसाच. पण हुजूर दिला तर तोही तसाच," असं रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. कोकणात जाणारे रस्ते चांगलेच आहेत. पूल आणि त्याच्या आजूबाजूला असणारा सर्व्हिस रोड यामुळे थोडे अडथळे येत आहेत," असं रवींद्र चव्हाणांनी सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचलून आणून जेलमध्ये टाका, मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा असा आदेश दिला होता. रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन त्यांनी हा आदेश दिला होता.
जे कंत्राटदार काम सोडून पळाले त्यांना केवळ काळ्या यादीत टाकून उपयोग नाही. त्यांच्यामुळं माणसं मेली आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. एकालाही सोडायचं नाही, उचलून आणा जेलमध्ये टाका. लोक एवढे मेलेत त्याला हे जबाबदार आहेत. मला याचं रिपोर्टिंग करा, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. जेलमध्ये टाकल्याशिवाय यांना धडा मिळणार नाही. ही मोगलाई आहे का? मेसेज एवढा कडक गेला पाहिजे, परत कोणी काम सोडणार नाही अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला होता.