संगमेश्वर: पोलीस असल्याचे भासवत साखर कारखान्याची रक्कम पळवून नेणाऱ्या गाडीला पकडण्यात यश आलंय. कारखान्याचे साडेचार कोटी रुपये पळवून नेले जात होते. संगमेश्वर तालुक्यात ती रक्कम पकडण्यात देवरूख आणि संगमेश्वर पोलिसांना यश आले. रक्कम आणि गाडी ताब्यात घेतलीय. तसेच, तिघांना अटक केलीय.
कर्नाटकमधल्या माजी डीवायएसपी बी एस. चोकेमठ यांचे अपहरण करून आरोपी पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ कराड येथे उभे होते. ज्ञानयोगी शिवकुमार शुगर कारखाना विजापुरची साडेचार कोटी रूपये रक्कम घेऊन गाडी कर्मचाऱ्यांसह पुण्याकडे निघाली होती. आरोपींनी कराडमधल्या एका हॉटेलजवळ ही गाडी थांबवून बी एस चोकेमठ यांच्यासह रक्कम असलेली गाडी ताब्यात घेतली. आपण पोलीस आहोत, तुमच्याजवळची रक्कम संशयास्पद आहे असं सांगत पोलीस स्टेशनलाच काय तो फैसला करू, असं सांगत चोरट्यांनी रक्कम ताब्यात घेतली. याची माहिती सातारा पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी याबाबत गृह विभागाशी संपर्क साधत संपूर्ण राज्यात नाकाबंदी केली.
गाडी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कोळंबे ताम्हाने कोसुंब मार्गे संगमेश्वरला येत असताना देवरूख आणि संगमेश्वर पोलिसांनी तिचा पाठलाग केला... संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडी ताब्यात घेतली. गडीतून गजानन महादेव अदडीकर, महेश कृष्णा भांडारकर, चालक विकास कुमार मिश्रा, यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गाडीतून रोख रकमेच्या तिनही बॅगा हस्तगत करण्यात आल्या असून चार कोटी अटेचारळीस लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत तसेच या दरोड्यात आणखी एक गाडी पोलिसांना सापडली असून ह्या गाडीत आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत... मात्र अस जरी असलं तरी एवढी मोठी रक्कम नेमकी या ठिकाणी कशी आली तसंच त्यावर कोणी पळत ठेवून होत का आणि ज्याचं अपहरण झालंय त्याला अपहरण कर्त्यांनी का सोडलं असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.