रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर शहरातील वरचापाट भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या मगरीला स्थानिक तरुणांनी मोठ्या धाडसानं पकडली. वस्तीच्या दिशेने जाणाऱ्या या मगरीला पकडून या तरुणांनी वन विभागाच्या ताब्यात दिलंय. समुद्रावर फेरफटका मारत असताना आरेगावातील तरुणांना साडेसात फूट मगर दिसली. ही मगर वस्तीच्या दिशेने जात होती. मगरीमुळे वस्तीतील रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये आणि मगर सुरक्षित राहावी, त्यामुळे या तरुणांनी तातडीने दोरीच्या साहाय्याने तरुणांनी या मगरीला पकडले.
समुद्रचौपाटीवर सापडलेली ही मगर आरे येथून येणाऱ्या नदीतून आली असावी. पकडलेली मगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आणि या मागरीला गुहागर-चिपळूण मार्गावरील तांबी येथील धरणामध्ये सोडण्यात आली.